Friday, February 7, 2025
Homeपुणेमावळडॉ. तपसे यांनी कामशेत येथील अनाथाश्रमातील चिमुकल्यांची आरोग्य तपासणी करत, दिले आरोग्याविषयी...

डॉ. तपसे यांनी कामशेत येथील अनाथाश्रमातील चिमुकल्यांची आरोग्य तपासणी करत, दिले आरोग्याविषयी मार्गदर्शन…

मावळ : कामशेत येथील मायेचा हाथ सोशल फौंडेशन च्या वतीने चालवण्यात येणाऱ्या अनाथ मुलांच्या आश्रमात डॉ दत्ता तपसे यांनी मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप करत दिला अनाथाना मायेचा हात.
डॉ दत्ता तपसे हे कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुजू आहेत.त्यांना एक दिवस वरिष्ठानी कामशेत येथे OPD करण्यासाठी सांगितले होते. त्यावेळी OPD संपल्या नंतर त्यांनी अनाथ मुलांच्या आश्रमात जाऊन चिमुकल्यांची आरोग्य तपासणी केली.तसेच त्यांना खाऊ व औषधं वाटप केली. यावेळी त्यांच्या सोबत आरोग्य सेवक विकास कापसे हे ही उपस्थित होते. डॉ. तपसे यांनी मुलांसोबत मनमोकळ्या गप्पा मारून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवले. त्यांनी मुलांना आरोग्य शिक्षण, चांगल्या सवयीबद्दल मार्गदर्शन केले.
डॉ तपसे यांनी मुलांना एक दिवस सहल म्हणून आपण सर्वजण किल्ल्यावर जाऊ असे सांगितले व भविष्यात मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष लिखित नाशिककर यांनी आभार व्यक्त केले व अशीच मदतीची अपेक्षा केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page