डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंती निमित्त फळांचे वाटप…

0
68

लोणावळा : भगवान महावीर जयंती व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक 14 एप्रिल रोजी सिद्धार्थ नगर येथील युवा कार्यकर्त्यांच्या वतीने नागरिकांना फळांचे वाटप करण्यात आले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व मानवंदना देण्यासाठी हजारोच्या संख्येने लोणावळा शहर व ग्रामीण परिसरातून जन समुदायाची दिवसभर लोणावळ्यात लाट उसळली होती.


उन्हाचा तडाखा असूनही हजारोंच्या संख्येने लहान मोठे व महिला भगिनी लोणावळ्यात बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यासाठी येत असताना लोणावळा शहरातील अनेक सामाजिक संस्था, मंडळे व दानशूर व्यक्तींकडून पाणी, थंड पेय व खाऊचे वाटप करण्यात आले

तसेच समाजकार्य हीच खरी मानवंदना या भावनेतून सिद्धार्थ नगर येथील युवक नितेश मुरलीधर जाधव व त्याच्या काही सहकाऱ्यांनी लोणावळ्यात बाबासाहेबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भीम सैनिक व महिला,लहानांना फळ वाटप करून फळांचा आस्वाद देत डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पण केली.