लोणावळा (प्रतिनिधी): आय एन एस शिवाजी एअर फोर्स स्टेशन हद्दीत ड्रोन द्वारे शूटिंग काढल्या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये भाग 6 गुन्हा र .नं.171/2023 भा.द.वि. का. कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नोहंमद अर्शद आलम (वय 24 वर्षे एअर फोर्स पोलीस रा. पुणे मुळ राहणार गाय जागरी पोस्ट- पिंडारी, जि. डुमका, राज्य झारखंड)यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
राहूल बालकृष्ण बडोले (वय 32 वर्षे, रा. प्लेंट शायद जि कुला,श्रीमान्स कॉम्प्लेक्स, बांद्रा इस्ट, मुंबई – 51, मुळ रा. 1001 बी एस बडोले, जिल्हा भंडारा ) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि. 13 रोजी सायकाळी 05.00 वाजण्याच्या सुमारास सदर आरोपी याने कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता एअरफोर्स स्टेशन जवळील परीसरात आरोपी याने कोणत्याही कार्यालयाकडील कोणतीही पूर्व परवानगी न घेता त्याच्या ताब्यातील ड्रोन द्वारे शुटींग करत मिळून आला आहे. सदर मजकूराच्या फिर्यादे वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून.पुढिल तपास पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या आदेशान्वये पोलीस नाईक शिंदे हे करत आहेत.