तळेगाव पादचारी महिलेचे गळ्यातील 40 हजाराचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे फरार..

0
73

तळेगाव दाभाडे : पदचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावल्याचा प्रकार रविवारी दि.16 रोजी रात्री 8:45 च्या सुमारास यशवंतनगर तळेगाव दाभाडे येथे घडला . याबाबत महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी महिला रविवारी दि.16 रात्री 8:45 च्या सुमारास यशवंतनगर पोस्ट ऑफिसपासून पायी चालत जात होत्या . त्यावेळी त्यांच्या समोरून एका मोपेड दुचाकीवरून दोन चोरटे आले . त्यांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 40 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पसार झाले आहेत. सदर चोरट्यांचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत .