तळेगाव येथील घटना, एकाच्या डोक्यात दगडी घालून केले जखमी,तळेगाव पोलिसांकडून एकास अटक..

0
42

तळेगाव दाभाडे : तुला लय मस्ती आली का , आमच्या भाईविषयी कशाला विचारतोस असे म्हणत तिघांनी एकाच्या डोक्यात दगडी मारून जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार दि.11 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे घडली .याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एकाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी कौस्तूभ उर्फ केजी किसन जगताप ( वय 20 , रा . कडोलकर कॉलनी , तळेगाव दाभाडे ) याला पोलिसांनी अटक केली असून त्याचे साथीदार धीरज अनिल गरूड आणि कुणाल मोहीत दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धीरज विजय गायकवाड ( वय 28 , रा . सिद्धार्थनगर , तळेगाव दाभाडे ) याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , फिर्यादी धीरज याने त्याचा मित्र सुदेश याला फोन करून बाबा उर्फ कुणाल ठाकूर हा कुठे आहे , असे विचारून फोन ठेवून दिला . त्यानंतर सुदेश याच्या फोनवरून कुणाल दुबे याने धीरज याला फोन केला आणि तुला बाबा उर्फ कुणाल ठाकूरकडे काय काम आहे , असे विचारून फोन कट केला . त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी धीरज उभे असलेल्या ठिकाणी आरोपी आले . तुला लय मस्ती आली आहे का , बाबा ठाकूर कोण आहे तुला माहिती नाही का , बाबा आमचा भाई आहे , त्याच्याविषयी कशाला विचारतोस , असे आरोपी हे फिर्यादी धीरज याला म्हणाले . त्यावरून दहशत निर्माण करून आरोपींनी फिर्यादी धीरज याच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. याबाबत अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.