Tuesday, May 30, 2023
Homeपुणेतळेगावतळेगाव येथे 28 शिक्षकांचा सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरव…

तळेगाव येथे 28 शिक्षकांचा सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरव…

तळेगाव (प्रतिनिधी):श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी व छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती याचे औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यात 28 शाळांमधील निवड झालेल्या शिक्षिकांना गौरविण्यात आले. शुक्रवार दि. 10 रोजी सुशीला मंगल कार्यालय तळेगाव येथे हा सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यात गौरविण्यात आलेले शिक्षक व शाळा -1) लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्रमांक 3 -शिष्यवृत्ती मार्गदर्शिका- ज्योती श्रीकांत बुरांडे, 2) जैन इंग्लिश स्कूल-गणित – सुचित्रा विशाल भोर,3) माऊंट सेन्टेन्स – इंग्रजी गणित पर्यावरण- प्रिया शहा, 4) स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल – विज्ञान गणित- सुजाता अमर गुंजाळ, 5)रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन-गणित विज्ञान- सुनीता उदय दांगट, 6) विश्व प्रज्ञा लय ज्ञान संस्कार मंदिर – गणित शास्त्र- आशा गणेश राऊत, 7) सरस्वती माध्यमिक विद्यालय – सहावीचे सर्व विषयांचे अध्ययन-अनिता बबन कुंभार, 8)आदर्श विद्या मंदिर – विज्ञान गणित – सौ सारिका काळुराम थरकुडे, 9)मामासाहेब खांडगे इंग्लिश स्कूल-गणित – स्वाती काडनेकर ,10)आदर्श माध्यमिक विद्यामंदिर- इंग्रजी विज्ञान मराठी- सुजाता डावखरे,17)एम्प्रेस इंटरनॅशनल स्कूल-इंग्रजी भूगोल- सित लक्ष्मी अय्यर, 12)मेथोडेस्ट गर्ल्स स्कूल-इंग्रजी- आसावरी सुधीर क्षेत्रे,13) नगरपरिषद माध्यमिक शाळा क्रमांक 2- इंग्रजी- वर्षा गोरख थोरात, 14)नवीन समर्थ विद्यालय – मराठी – कमल दशरथ ढमढेरे, 15) इंद्रायणी प्राथमिक विद्यालय – गणित – मीनल कुलकर्णी,16)इंद्रायणी माध्यमिक विद्यालय – इतिहास भूगोल – स्नेहा कल्याण कस्तुरे, 17) संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक 6- इंग्लिश गणित विज्ञान- हर्षाली विलास निंबाळकर,18)जिजामाता प्राथमिक शाळा क्रमांक 5 – विज्ञान गणित- आशा सुबोध गायकवाड, 19) पू. वा. परांजपे विद्यामंदिर – मराठी – अनिता रवींद्र नागपुरे, 20) बाल विकास विद्यालय – इंग्रजी- सौ कांचन प्रवीण कडू, 21) हचीग्ज इंग्लिश मीडियम स्कूल हिंदी अर्थशास्त्र – मनिनद्रा कौर, 22) थोर समाजसेवक नथू भाऊ भेगडे प्रथमिक शाळा क्रमांक 2 – विज्ञान- जयश्री चंद्रकांत उंडे,23)नगरपरिषद माध्यमिक शाळा क्रमांक 6-गणित भाग1,2- वसुंधरा सुदाम माळवदकर,24) सरस्वती प्राथमिक शाळा-कला संगणक इतिहास- अरुंधती देशमाने,25)पैसा फंड प्राथमिक शाळा क्रमांक 1- सर्व विषयांचे अध्ययन-आशा बाळू लबडे,26) पैसा फंड प्राथमिक शाळा क्रमांक 2- सर्व विषयांचे अध्ययन-सुरेखा संजय हांडे, 27) नगरपरिषद माध्यमिक शाळा क्रमांक 1- इतिहास- वैशाली सर्जेराव साबळे, तर 28)उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक 4- विज्ञान – रुकसाना नसीर पटेल यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष संजय शिंदे यांनी केले अध्यक्ष मनोगत अमर खळदे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला शुभेच्छा ॲड रूपाली दाभाडे यांनी दिल्या. सावित्रीबाई फुले यांवर व्याख्यान स्नेहल बाळासराफ यांनी दिले सूत्रसंचालन भावना चव्हाण यांनी केले.
यावेळी संस्थापक खंडू टकले, महादेव खरटमल, सतीश गरुड, विजय शेटे, आदित्य टकले, सागर टकले, ऋषिकेश शेटे, सागर लगड, संग्राम शिंदे, संदीप गडसिंग, संतोष परदेशी, अॅड रूपाली दाभाडे, स्नेहल बाळसराफ, निशा पवार, ज्योती शिंदे, शैलजा खळदे, दिपाली खळदे, बेबी लांडे, शोभा परदेशी, सदाशिव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page