तळेगाव (प्रतिनिधी): धावत्या रेल्वे गाडीची धडक लागून एका 35 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला आहे. ही घटना तळेगाव रेल्वे स्टेशन रेल्वे कि. मी. क्र.157-24 जवळ रात्रीचे 12:05 वाजण्याच्या सुमारास घडली.
सदर मयत इसम हा अंदाजे वय वर्ष 35 असून अज्ञात आहे.त्याचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. – अंगाने मजबूत, चेहरा चेंदा मेंदा झालेला, केस काळे, उंची 5 फूट 5 इंच इतकी असून त्याने अंगावर काळ्या रंगाचे जर्किंग आत आकाशी रंगाचा नेटचा टी शर्ट, पांढऱ्या रंगाचे बनियान व काळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट आत मध्ये जॅकी कंपनीची अंडर पॅन्ट नेसली आहे.
तरी सदर मयत इसम आपल्या परिचयाचा, परिसरातील असल्यास लोहमार्ग पोलीस तळेगाव स्टेशनशी संपर्क साधावा.