तळेगाव शहर मनसे कार्यकारिणी आढावा बैठक संपन्न…

0
45

तळेगाव दाभाडे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तळेगाव शहर कार्यकारणी निवडी बाबतची दुसरी आढावा बैठक आज तळेगाव येथील वैष्णवी हॉल येथे संपन्न झाली.मावळ तालुका कोर कमिटीच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.

यावेळी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर ,मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भांडवलकर,कोर कमिटी सदस्य तानाजी तोडकर,सुरेश जाधव,राहुल खळदे, संदीप शिंदे,राहुल मांजरेकर, सागर सुतार,दीपक सोनवणे,प्रसन्न आंधळे,पौरस डुकरे तसेच मनसैनिक उपस्थित होते.