तळेगाव 17 वर्षीय तरुणाचा गोळया झाडून खून,,, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल..

0
782

तळेगाव दि. 23 – एका 17 वर्षीय तरुणावर गोळ्या झाडून हत्त्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्री तळेगाव येथे घडली.

दशांत अनिल परदेशी (वय 17, रा.तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी त्याचे वडील अनिल परदेशी यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.दिलेल्या फिर्यादेवरून तळेगाव दाभाडे पोलीसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार तळेगाव दाभाडे येथील नॅशनल हेवी कंपनीजवळ बुधवारी रात्री अज्ञातांनी दशांत परदेशी याच्यावर गोळीबार केला त्यात गंभीर जखमी झाल्याने दशांतचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटना स्थळी दाखल झाले.

दशांत वर झालेल्या खुनी हल्ल्याचे गूढ अजून कायम असून हा हल्ला कोणी व का केला याची माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नसून पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.