तहानलेल्या कडावकरांना आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचा आधार !

0
120

जलजीवन मिशन योजने अंतर्गत सहा कोटी पन्नास लक्ष रुपये मंजूर..

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)कर्जत तालुक्याचा सर्वांगीण विकास साधताना पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष प्रयत्न करून करोडो रुपयांचा निधी उपलब्ध केल्यावरच पाणी टंचाई तालुक्यातून हद्दपार होऊन ग्रामीण भागांचा विकास होईल , हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी कडाव ग्रामपंचायत हद्दीतील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत सहा कोटी पन्नास लक्ष रुपयांचा निधी पाणी पुरवठा मंत्री नाम.गुलाबराव पाटील यांच्याकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त केलेले पत्र नुकतेच मंजूर करून घेतले व आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
आता मौजे कडाव ग्रामपंचायत हद्दीतील पाणी टंचाई दूर होणार आहे.त्यामळे येथील नागरिकांना वर्षेनुवर्षे भेडसावणारी पाणी समस्या सुटणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.कर्जत तालुक्यात प्रमुख बाजारपेठ म्हणून उदयास येत असलेले कडाव ग्रामपंचायत हद्दीत मौजे कडाव येथील नळ पाणी पुरवठा योजना दरडोई खर्च हा विहित निकषांपेक्षा जास्त असल्यामुळे सदर गाव पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यासाठीचा प्रस्ताव मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग – ठाणे यांनी शासनाच्या मान्यतेकरिता सदर प्रस्ताव सादर केला होता.
प्रस्तुत पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण – ठाणे यांनी दि . ९ डिसेंबर २०२१ रोजी तांत्रिक मान्यता प्रदान केली तसेच सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण – मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समितीच्या दि . २२ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे . सदर योजनेच्या दरडोई शासन निकषापेक्षा जास्त आहे म्हणूनच मौजे कडाव , तालुका कर्जत येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या ६५०९४३८८ /- रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात शासनाने विचार केलेला होता म्हणूनच नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेता मौजे कडाव येथील नळ पाणीपुरवठा योजना ही ५५ लिटर दरडोई दर दिवशी क्षमतेच्या रुपये ५९०५ दरडोई खर्च असलेल्या रुपये ६५०९४३८८ रू.मान्यता देण्यात आलेली आहे.
सदरच्या योजनेसाठी कर्जत – खालापूर मतदार संघाचे दमदार कार्य असणारे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून या जलजीवन मिशन योजने अंतर्गत कडाव नळ पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे . तर पाणी पुरवठा मंत्री मा.नाम.गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते प्रशासकीय मान्यतेचे पत्र आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.