तिरुपती देवस्थान प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणांनी दुमदुमले !

0
312

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) रायगड जिल्ह्यातील कर्जत शहरातील शिवभक्त मर्द मावळ्यांनी आंध्रप्रदेश येथील तिरुपति बालाजी देवस्थान मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर ” छत्रपती शिवाजी महाराज की जय ” अशा गगनभेदी घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रती असलेले आपले स्फूर्तिदायक प्रेम दाखवून दिले , मात्र त्याला कारण ही तसेच आहे , गेल्या काही महिन्यापासुन आंध्र प्रदेश मधील तिरुपती बालाजी देवस्थान चर्चेत आले आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एक व्यक्ती तिथे गेला असता त्याच्या गाडीमध्ये लावलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टिकर / मूर्ती तिरुपती संस्थांनतर्फे गाडीतून काढायला लावण्यात आले होते ,या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील नागरिकांकडुन तिरुपती देवस्थानाबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता.त्यामुळे अखेर तिरुपती बालाजी देवस्थानने माघार घेतली असुन यापुढे शिवरायांची मूर्ती घेऊन जाण्यास मंदिर कमिटीने परवानगी दिली आहे.

छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या भूमीत कर्जत तालुक्यातील शिवभक्तांनी देखील याच पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेश येथील तिरुपति बालाजी मंदिरात जाऊन मुख्य प्रवेशद्वारावर आज दिनांक ५ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या नावाने घोषणा देऊन आसमंत दुमदुमवून टाकला.

याप्रसंगी कर्जत मधील दिशाकेंद्राचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जगदीश हरिश्चंद्र दगडे , राजेश उर्फ बापु कर्णुक , संतोष पाटील , शाम दाभाड़े , राजू तुपे , प्रभाकर गाडे , मोहन काळे , प्रशांत पाटील , निवृत्ती कर्पे , समीर ठाकरे , नंदू माळी आदी कर्जतकर नागरिक उपस्थित होते .शिवभक्तांच्या या छत्रपतींच्याबद्दल विशेष प्रेमामुळे कर्जतचे नाव त्यांनी रोशन केले आहे.