Saturday, October 1, 2022
Homeपुणेलोणावळातुंगार्ली येथील "हिंदुत्व ढोल ताशा "पथकाचा वाद्यपूजन समारंभ उत्सहात संपन्न...

तुंगार्ली येथील “हिंदुत्व ढोल ताशा “पथकाचा वाद्यपूजन समारंभ उत्सहात संपन्न…

लोणावळा : गणेशोत्सवाच्या आगमनाची जय्यत तयारी, तुंगार्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ॐ कार तरुण मंडळ संलग्न हिंदुत्व ढोल ताशा व ध्वज पथकाचा वाद्यपुजन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.

यावर्षी पथक 11 व्या वर्षात पदार्पण करीत असून लोणावळा व आसपासच्या परिसरात पथकाचा असंख्य चाहतावर्ग आहे . दरवर्षी गणेशोत्सव मिरवणुकीत काहीतरी नाविन्यपूर्ण वादन करण्याचा प्रयत्न पथकाकडून केला जातो . तीच परंपरा कायम राखण्याचा मानस पथकाचे संस्थापक श्री सचिन केदारी यांनी व्यक्त केला.

यावेळी वाद्यपूजन ॐ कार तरुण मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सेक्रेटरी मगनभाई पुरोहित, श्री. अनंता गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर पथकाच्या सरावाचा शुभारंभ श्री.बापुलाल तारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.गणेशोत्सवाच्या निमित्ताने तरुणाईने संस्कृतीच्या जतनासाठी केलेला हा प्रयत्न उल्लेखनीय असल्याचे मत श्री गायकवाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले .

यावेळी शुभारंभ व वाद्यपूजन समारंभास पथकाचे अध्यक्ष श्री. राकेश अंभोरे , ताशाप्रमुख श्री. शैलेश शेलोकर , ढोलप्रमुख श्री. कुलदीप खिलारे , तुबार घोंगे , राहुल अंभोरे , मनिष गायकवाड , शुभम गावडे , सुधिर ओझरकर , आदेश अंभोरे , यश गायकवाड , कुणाल गायकवाड, शुभम जाचक , शार्दुल शिंदे , आतिष अंभोरे , यश कूटे , गगन गोजे, सिद्धेश ठाकुर , करन गोसावी , यशोधन पिंगळे , कुटे यांसमवेत ॐ कार तरुण मंडळाचे जयवंत गोसावी , सतिश अंभोरे , प्रितम नागदे , तन्मय सानिका अंभोरे , श्रुती कुटे , तृप्ती कुटे,मंडळाचे सल्लागार नितीन गायकवाड ,सतीश गावडे , अशोक साळवे , शफिक खलिफा आदि मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page