Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई" तू अशा बातम्या देत आहेस ,जणू तुझ्यावरच बलात्कार झाल आहे ,"...

” तू अशा बातम्या देत आहेस ,जणू तुझ्यावरच बलात्कार झाल आहे ,” बदलापूरच्या माजी नगराध्यक्षाची मस्तवाल भाषा..

प्रतिनिधी : श्रावणी कामत
बदलापूर : सत्तेचा माज काय असतो हे आज बदलापूर मध्ये दिसले.बदलापूर येथील अत्याचाराचे वार्तांकन करणारया एका महिला पत्रकाराशी बोलताना बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी असभ्य आणि संतापजनक भाषेत अरेरावी केली.. ते म्हणाले “तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे ,” वामन म्हात्रे यांच्या या वक्तव्याचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मिडिया परिषदेने तीव्र शब्दात निषेध केला असून वामन म्हात्रे यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी एस.एम देशमुख यांनी केली आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती अशी की , बदलापूर येथील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.. . याप्रकरणी आज सकाळी साडे सहा वाजता बदलापूर पूर्व येथील आदर्श शाळेबाहेर पालक आणि नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात काही आंदोलकांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास हा मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला. आंदोलकांनी मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद केली. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून पत्रकारांनीही हा विषय लावून धरला आहे.
मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून येणारी अशी दोन्ही रेल्वे सेवा बंद केली. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असून पत्रकारांनीही हा विषय लावून धरला आहे.

याच कारणावरून बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांची एका महिला बातमीदारासोबत बोलताना जीभ घरसली आहे. तू अशा बातम्या देत आहेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, अशा भाषेत म्हात्रे यांनी महिला बातमीदारावर आगपाखड केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात एक पुढारी महिलांबद्गल अशी भाषा वापरतो हे अत्यंत निंदनीय असून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन वामन म्हात्रे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही एस.एम.देशमुख यांनी केली आहे..
- Advertisment -

You cannot copy content of this page