त्या शुरु धाडसी युवकांचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग लोणावळा शहराच्या वतीने सत्कार..

0
55

लोणावळा : खंडाळा येथील तलावात बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवीणाऱ्या धाडसी मुलांनाचा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग लोणावळा शहराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

लोणावळा नगरपरिषदेच्या खंडाळा तलावात दि. १४ बाल दिना रोजी बोटिंग करणाऱ्या पर्यटकांची बोट उलटली आणि त्यावेळी पाण्यात पडलेल्या लहान मुलांचे प्राण वाचविण्यासाठी तेथील स्थानिक लहान मुलांनी ती दुर्घटना बघता क्षणी आपल्या जीवाची पर्वा न करता त्या परिवाराला वाचवले त्या मुलांनी त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाल दिनाचे महत्व पटवून दिले आहे त्याच लहान धाडसी युवकांचा मिठाई , टिशर्ट व श्रीफळ देऊन राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे लोणावळा शहर अध्यक्ष जयेश रामजी देसाई व सामाजिक न्याय विभाग लोणावळा शहर उपाध्यक्ष संदीप कडू यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी सदर कार्यक्रमास किरण पाळेकर , नितीन कडू, विनायक जाधव ,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग पुणे शहर उपाध्यक्ष रमेश पाटेकर , रोहित गायकवाड,आकाश देसाई , प्रेम देसाई , विजय नायडू तसेच राजा नायकवाडे इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.