दरोड्याचा डाव उधळून लावत,, लोणावळा शहर पोलिसांनी चार जणांना केली अटक..

0
1254

लोणावळा दि .3 : लोणावळा शहर पोलीसांची चितथरारक कामगिरी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांना शिताफिने केले जेरबंद.

आरोपी सोहेल जावेद शेख ( वय 20 वर्ष ), ओमकारसिंग अवतारसिंग जुनी ( वय 21 वर्ष ) यांच्या समवेत दोन अल्पवयीन मुले ( सर्व राहणार वैदवाडी हडपसर पुणे ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि .03/ 02/ 2022 रोजी रात्री 01:30 च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक लतीफ मुजावर पोलीस पथकासह खंडाळा दूरक्षेत्रामध्ये पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुदळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खंडाळा हद्दीतील टाटा डक लाईन येथील पडीक डी पी रूम मध्ये काही इसम दरोडा घालण्याच्या तयारीत बसलेले आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल कुदळे यांनी सदर बातमी पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांना दिल्यावर पोलीस पथक व दोन पंच खाजगी वाहनाने दरोडेखोर लपून बसलेल्या ठिकाणी दाखल होताच पोलीस पथक पाहून सदर इसमांनी पळ काढला तेवढ्यात पोलीस उपनिरीक्षक मुजावर व पोलीस पथकाने मोठया शिताफिने चौघाना ताब्यात घेतले.

त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या जवळ एक लोखंडी गोल पाईप, एक छन्नी, एक स्क्रू ड्राइवर, एक विळा, एक वस्तरा, एक धारदार चाकू, एक निळ्या व काळसर रंगाची छन्नी, प्लास्टिक मूठ असलेले कात्रीचे एक पाते, एक विवो कंपनीचा मोबाईल, आकाशी रंगाची मूठ असलेली वायर कटर,दोन ब्लेडची पाती, पिवळसर रंगाची छन्नी,व पेपरमध्ये पुडी बांधलेली लाल मिरची पावडर असे साहित्य मिळून आले आहे.पोलीस बघून पळ काढणाऱ्या या चार जणांना अटक करण्यात पोलीस पथकाला यश आले असून,

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लतीफ मुजावर,सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, अंमलदार सुनील देशमुख, प्रवीणकुमार गोसावी, शेखर कुलकर्णी, सतीश कुदळे, पवन कराड, शंकर धनगर, मनोज मोरे, नितीन सूर्यवंशी, स्वप्नील पाटील, पोलीस मित्र विनोद चव्हाण यांनी ही दमदार कामगिरी करत दरोड्या साठी धाक लावून बसलेल्या दरोदेखोरांचा डाव उधळून लावल्याची प्रशंसनीय कामगिरी केली आहे.