दरोड्याच्या तयारीत असलेला फरार आरोपी लोणावळा शहर पोलिसांच्या ताब्यात…

0
626

लोणावळा दि.19 : लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील 03 फेब्रुवारी रोजी दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दरोदेखोरांना लोणावळा शहर पोलिसांनी वेळेतच ताब्यात घेतले होते.त्यातील भा द वी कलम 399,402 असा गुन्हा दाखल असलेल्या एका फरार आरोपीस लोणावळा शहर पोलिसांनी मोठया शिताफिने ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी बिभीषण उर्फ बिब्या जालिंदर जगताप ( रा . मंगळवार पेठ, पुणे ) याने वेळप्रसंगी पळून जाऊन फरार झाला होता.

फरार आरोपीच्या मागावर असताना गोपनीय सूत्रांकडून याची माहिती मिळाल्यास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक लतिफ मुजावर , अंमलदार नितीन सुर्यवंशी , मनोज मोरे , पवन कराड यांनी सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने लोणावळा शहर पोलीस स्टेशन गु .रजि .नं.09 /2022 भा.द.वि. कलम 380, 461 या गुन्हयातील खंडाळा येथील बाजारपेठेमध्ये सागरमल सोहमलाल हार्डवेअर या दुकानाचा पत्रा उचकटून दरोडा घातला व तेथून पॉलीकॅब कंपनीच्या वायर बंडलची चोरी करुन ती वायर जाळुन त्यातील 49 किलो ताब्यांच्या तारा असा माल लपवून ठेवल्याची कबुली दिली असता सदरचा माल आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदर आरोपीस न्यायालयाने मॅजि.कस्टडीची रिमांड मंजूर केल्याने त्यास मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी दिली आहे.