Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडदर महिन्याच्या पौर्णिमा या सणासारख्या साजऱ्या कराव्यात - ऍड. प्रवीण पंडित..

दर महिन्याच्या पौर्णिमा या सणासारख्या साजऱ्या कराव्यात – ऍड. प्रवीण पंडित..

मार्गशीर्ष पौर्णिमा गुंडगे येथे मोठ्या उत्साहात साजरी..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) बौद्ध धम्मात पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे . भगवान गौतम बुद्धांचा जन्म – ज्ञान – महापरिनिर्वाण हे पौर्णिमेला झाले असल्याने म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमा या सणासारख्या साजऱ्या कराव्यात यासाठी प्रत्येकाने बुद्ध विहारात जाणे गरजेचे असून पंचशिलाचे पालन केल्यास आपण बौद्ध धम्म आचरणात आणू शकाल , असे कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागात शिल्पकार युवक मंडळ ( ३७३ / २०२२ ) व रमाबाई महिला मंडळ आयोजित केलेल्या बौद्ध मार्गशीर्ष पौर्णिमा कार्यक्रमात धम्मकाया फाउंडेशन चे प्रमुख ऍड.प्रविण पंडित सर मार्गदर्शन करत होते.
मागील दोन महिन्यापासून शिल्पकार युवक मंडळ तसेच रमाबाई महिला मंडळ गुंडगे यांच्या वतीने बौद्ध पौर्णिमा बुद्ध विहार गुंडगे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.यावेळी दिवंगत श्रीरंग गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त उमेशजी गायकवाड ( माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक – कर्जत नगर परिषद ) यांनी बुद्धविहारास कपाट भेट दिले तसेच खिरपुरीचे धम्मदान ही केले.
या कार्यक्रमा दरम्यान प्रमुख वक्ते ऍड. प्रवीण पंडित सर यांनी ” बौद्ध संस्कृतीचे पुनर्जीवन ” या विषयावर प्रवचन व्याख्यानमाला सांगितली.यावेळी शिल्पकार युवक मंडळ यांच्या वतीने कर्जत न्यायालयात विनामूल्य जागेचा खटला लढणारे ऍड. कैलास मोरे यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला.तसेच शिल्पकार युवक मंडळ रजिस्टर करण्यात मदत करणारे उमेश पाल , कॉम . नाना ओव्हाळ वाचनालयात नियमित वर्तमानपत्र देणारे प्रदीप मोरे , निलेश निकाळजे , अविनाश पवार , दिलीप ( डी .के . बाबू ) गायकवाड , यांचा सत्कार करण्यात आला , तर गुंडगे बुद्ध विहारास दोन गुंठे जमीन दान देणारे दिवंगत प्रभाकर गणपत उबाळे यांचा मुलगा नवनीत उबाळे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
बुद्ध विहारास कपाट भेट देणारे भगवान भंडारी यांचाही सत्कार केला , वाचनालय पुस्तक देणारे आनंद ओव्हाळ , बुद्ध विहारास स्पीकर – माईक व मशीन देणारे विकास भालेराव , वाचनालयातील नियमित वाचक मीनाक्षी भवर व शुभम मोरे यांचा देखील सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी उपनगराध्यक्ष वसंत मामा सुर्वे होते , नगरसेवक उमेश आप्पा गायकवाड , सुरेश भालेराव ( पीएसआय कर्जत ) , माधुरी भालेराव , सुमित भालेराव , गायकवाड – आर्मी ऑफिसर , मधुकर जाधव , दशरथ जाधव , मुक्ताई गायकवाड , अरुण पवार , धनवे मामा यांची उपस्थिती प्रार्थनिय होती . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिल्पकार युवक मंडळाचे विद्यानंद ओव्हाळ , हेमंत सोनावणे , अमोल साळवी , संतोष सोनावणे , गिरीश वाघमारे , प्रणित गायकवाड , भूषण मोरे , रोहन मोरे , साहिल मोरे , रुपेश रोकडे , रुपेश घोडके , सनी काकडे , चिराग तळकरे , रमाबाई महिला मंडळाचे कविता ढोले , दिपाली रोकडे , बबिता साळवी , दर्शना पवार , कविता पवार , शोभा मोरे ,हर्षला मोरे , हर्षला गायकवाड , यांनी मोलाचे सहकार्य केले.

You cannot copy content of this page