Tuesday, May 30, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडदहिवली परिसरातील नागरी सुविधांचे भूमिपूजन कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते संपन्न..

दहिवली परिसरातील नागरी सुविधांचे भूमिपूजन कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते संपन्न..

नगरसेवक संकेत भासे यांच्या प्रयत्नांना यश !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली प्रभागातील तब्बल २२.५ कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन सोहळा कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते पार पडला . यावेळी परिसरातील अनेक मान्यवर व कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी , उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल व नगरसेवक – नगरसेविका उपस्थित होते.

कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक ऍड.संकेत भासे यांच्या प्रयत्नातून दहिवली सुयोग नगर , समर्थ नगर परिसरातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्यात यश आले असून या मध्ये १) मौजे सूयोगनगर समर्थ नगर येथील रस्ते व गटार तयार करणे. २) मौजे ललानी बिल्डिंग येथील रस्ता सुशोभीकरण करणे.३) मौजे इंजिनियरिंग कॉलेज कडे जाणारा रस्ता तयार करणे ४) मौजे जुने वेणगाव कडे जाणारा रस्ता तयार करणे. ५) मौजे दहीवली ते आकुर्ले रस्ता तयार करणे , या विविध कामांचे भूमिपूजन आज पार पडले . यामुळे नागरिकांच्या समस्या सुटल्या असून भूमिपूजन कार्यक्रमामुळे भविष्यात लवकरच येथील कामे पार पडणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

यावेळी कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या समवेत उपजिल्हा प्रमुख भाई गायकर , नगराध्यक्ष सुवर्णा जोशी , उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल , मुख्याधिकारी वैभव गारवे , नगरसेवक प्राची डेरवनकर , नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती वैशाली मोरे , संपर्क प्रमुख पंकज पाटील , नगरसेवक संकेत भासे , नगरसेवक बळवंत घुमरे ,माजी नगरसेवक बाळाजी विचारे , शिवसेना कर्जत शहरप्रमुख अभिषेक सुर्वे , शहर अधिकारी सचिन भोईर , शहर संघटक नदीम भाई खान , उपशहर प्रमुख दिनेश कडू , विभाग प्रमुख विशाल बैलमारे , ऋषभ लाड , गणेश लाड , दिलीप बोराडे , प्रवीण गांगल , कल्पना दास्ताने , सौ.मनिषा जनार्धन भासे , दर्शन खामगावकर , भाऊ खानविलकर , विकास त्रिभुवन , अभियंता मनीष गायकवाड , त्याचप्रमाणे अनेक मान्यवर व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

You cannot copy content of this page