Tuesday, May 30, 2023
Homeपुणेमावळदहिवली येथील हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,साधना केदारी प्रथम विजेत्या…

दहिवली येथील हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,साधना केदारी प्रथम विजेत्या…

कार्ला (प्रतिनिधी) : दहिवली येथील अश्विनी अमोल भेगडे, व सामाजिक कार्यकर्ते अमोल जगन्नाथ भेगडे मित्र परिवार आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमातील खेळ रंगला पैठणीचा यात साधना केदारी या पैठणीच्या मानकरी ठरल्या. परिसरातील सर्व महिला भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. मावळातील कॉमेडी कलाकार सिने अभिनेते सुशांत घाटसावळीकर अर्थात सुशांत भाऊजीनी हा कार्यक्रम घेतला.
मावळ तालुका भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर यावेळी माजी उपसभापती शांताराम कदम, युवा मोर्चा सरचिटणीस गणेश ठाकर, हभप दिलीप महाराज खेंगरे, हभप भाऊसाहेब मापारी, नवनाथ कोंडभर, किसन येवले, शेखर दळवी, भाजपा महिला तालुका आध्यक्षा सायलीताई बोत्रे, मा. जि. प. सदस्य सुमित्रा जाधव, मा. उपसभापती कल्याणी ठाकर, सीमा आहेर, हभप अनिता महाराज मोरे, गायिका रुपाली शिंदे, कांचन कालेकर, मंडप व्यवस्थापक वसंतराव गायकवाड आदींसह भाजपा पदाधिकारी तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
होममिनिस्टर कार्यक्रमात महिला भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. महिलांसाठी तळ्यात मळ्यात सोबतच अनेक कॉमेडी खेळ, उखाणे असा तीन तासांचा कार्यक्रम घेण्यात आला.सिनेअभिनेते सुशांत घाटसावळीकर यांना सहकलाकार संपदा भिसे, आशा पुणेकर, शिवानी कांबळे, प्रदिप गवांडे (ज्यूनि.फँन्ड्री), आकाश पवार यांनी साथ दिली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून दहिवली परिसरातील अकरा विधवा महिला भगिनींना यावेळी साडी चोळी देवून सन्मान करण्यात आला. सहभागी सर्व महिलांना हँड मिक्सर हे विशेष बक्षिस देण्यात आले.
खेळपैठणीचा कार्यक्रमात मानाची पैठणी व सोन्याची नथ प्रथम क्र. सौ. साधना केदारी, मानाची पैठणी व्दितीय क्र. सौ. रेणुका देशमुख, गॅस शेगडी तृतीय क्र. सौ. अंजली घिसरे, मिक्सर चतुर्थ क्र. सौ, मंदा येवले, कुलर पाचवा क्र.सौ, स्वाती दळवी यांनी मिळविले. सर्व विजेत्या महिलांना बक्षिसे शुभांगी संतोष केदारी, पार्वती शंकर पडवळ, प्रज्ञा राम येवले, सायली बोत्रे, रेश्मा गुरूप्रसाद पडवळ, आश्विनी अमोल भेगडे, निकिता दत्तात्रय खेंगले, ज्योती दर्शन भेगडे, अमोल जगन्नाथ भेगडे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते अमोल भेगडे यांनी केले.

You cannot copy content of this page