दादया गवळी टोळीचा दरोड्याचा डाव उधळून लावत, आरोपींना हत्यारासह अटक..

0
122

पिंपरी चिंचवड : दरोडयाच्या तयारीत असलेल्या दादया गवळी टोळीच्या म्होरक्यासह सराईत गुन्हेगारांच्या टोळीस धारदार शस्त्रांसह अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट 2 ला यश आले आहे.

आनंद उर्फ दादया राजू गवळी ( वय 20 वर्षे , रा . जिवलग हौसिंग सोसायटी बिल्डींग नंबर 7,रुम नंबर 303,आझाद चौक निगडी ) दिपक अरुण चांदणे ( वय २२ वर्षे, रा.आर 1 बिल्डींग रुम नंबर 4 ओटास्किम निगडी ) सागर रामदास जाधव ( वय 21 वर्षे, रा . राहूलनगर पवळे शाळेजवळ बिल्डींग नंबर 12, रुम नंबर 6 ओटास्किम,निगडी) व त्यांचे 2 रेकॉर्डवरील अल्पवयीन साथीदार यांना गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने अटक केली असून त्यांच्या जवळून 1 धारदार लोखंडी तलवार , 2 धारदार लोखंडी कोयते , 1 लोखंडी रॉड , 2 मिरची पावडर पुड , दोर , मोबाईल , रक्कम असे मिळुन आले .याबाबत पोलीस हवालदार जयवंत राऊत यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादेवरून भा. द. वी.क.399,402 व भारतीय शस्त्र कायदा कलम 4 (25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) सह 135,142 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना वेळोवेळी चेक करुन त्यांच्या हालचालीवर पाळत ठेवण्याबाबत गुन्हे शाखांना आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनिय बातमीदारां कडून गुन्हेगारांच्या हालचालीवर पाळत ठेवली जात होती . दि. 16 रोजी तडीपार गुन्हेगार चेकींगसाठी पेट्रोलिंग करीत असतांना गुन्हे शाखा युनिट 2 चे पोना नामदेव कापसे व पोकॉ अजित सानप यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की , दादया गवळी टोळीचा म्होरक्या व रेकॉर्ड वरील तडीपार गुन्हेगार आनंद उर्फ दादया राजु गवळी, जाकीर उर्फ डॅनी कय्युम पठाण व सागर रामदास जाधव हे त्यांच्या सराईत साथीदारांसह रात्री निगडी भागात ट्रान्सपोर्टनगर परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार आहेत सध्या ते सर्वजण भिमाईनगर ओटास्किम निगडी येथे एकत्रीत येऊन दरोडयाच्या धारदार शस्त्रांची व साहीत्याची जुळवा जुळव करुन दरोडा टाकण्याची तयारी करीत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली .गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला असता सदर आरोपी हे दरोडा घालण्याच्या तयारीत असताना रंगे हात सापडले त्यांच्याकडे कसून तपास केला असता ते ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत अधिक तपास निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गिरीगोसावी हे करत आहेत.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड,पोलीस अंमलदार केराप्पा माने , दिपक खरात , शिवानंद स्वामी , दिलीप चौधरी , प्रमोद वेताळ , उषा दळे , जयवंत राऊत , देवा राऊत , विपुल जाधव , नामदेव कापसे , आतिष कुडके , सागर अवसरे , अजित सानप , शिवाजी मुंढे , उध्दव खेडकर , संदेश देशमुख यांच्या पथकाने केली आहे.