दिपकभाऊ निकाळजे सा. वि. संघटना आणि आर. पि. आय, ( A ) चा बोधिसत्व जन जागृत संघाला जाहीर पाठिंबा…

0
51
देहूरोड : दिपक भाऊ सामाजिक विकास संघटना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आहे )यांचा बोधिसत्व जन जागृत संघाला जाहीर पाठिंबा.बोधिसत्व जन जागृत संघ देहूरोड यांनी देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्ध विहाराचा विकास राज्यशासनामार्फत करण्यात यावा व त्याठिकाणी सर्व प्रथम शासकीय प्रशासक नेमण्यात यावे अशी मागणी बोधिसत्व जन जागृत संघाने शासन दरबारी केली आहे.
या मागणीस दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना मावळ तालुका तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( A ) मावळ तालुका, पुणे जिल्हा युवक यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी बोधिसत्व जनजागृत संघांचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी, दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेचे मावळ तालुका अध्यक्ष तेजस निकाळजे, उपाध्यक्ष कुमार चव्हाण, संघटक महेंद्र गायकवाड, देहूरोड शहराध्यक्ष सिद्धार्थ निकाळजे, तसेच आर. पि आय. ( A ) चे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अंकुश चव्हाण, मावळ तालुकाध्यक्ष चंद्रकांत ओव्हाळ, उपाध्यक्ष संजय गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.