दिवाळी निमित्त वडगाव प्रभाग 17 येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन…

0
175

वडगाव मावळ : मोरया ग्रुप व कृष्णा मल्टिपल सर्व्हिसेसच्या वतीने दिवाळी सणानिमित्त प्रभाग क्रमांक सतरा येथे हौसिंग सोसायटीतील स्वच्छता कर्मचारी व सभासदांसाठी स्नेह सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या सर्व सभासदांना सन्मानित करण्यात आले.

तसेच एक दिवा छत्रपती श्री शिवाजी महाराजांसाठी ज्यांच्यामुळे देवळात आज देव आहेत आणि एक दिवा ज्यांनी आपला धर्म राखीला असे आपले छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यासाठी त्यांच्याच नावाने स्थापन करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक सतरा मधील आपल्या छत्रपती श्री संभाजी महाराज नगर मित्र मंडळाच्या वतीने दीपोत्सव साजरा केला.

यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मंडळाचे अध्यक्ष अमोल गुडेकर, यशवंत शिंदे, अरविंद आवंढे, विठ्ठल धनावडे, रुपेश शेलार, प्रमोद जंगम रविकिरण काटकर, शरद तारू,संजय जाधव, चंद्रकांत शिंदे, अमित येले, प्रवीण सावंत, शिवाजी तावडे आणि मंडळाचे क्रियाशील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.