Friday, June 2, 2023
Homeपुणेलोणावळादुचाकी व ट्रेलरच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू....

दुचाकी व ट्रेलरच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू….

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर कुमार रिसॉर्ट जवळील विज वितरण कार्यालयासमोर शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास दुचाकी व ट्रेलरचा अपघात झाला.

ट्रेलर व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.संजय कोंडिबा कालेकर ( वय 40 , रा . भैरवनाथ नगर , कुसगाव लोणावळा ) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे .

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय कालेकर हे त्यांची दुचाकी गाडी क्र . MH 14 GR 9830 वरुन खोपोली बाजुकडून लोणावळ्यात येत असताना पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रेलर क्र . MH 14 GD 6909 यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला .
याप्रकरणी सतिष साठे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . फिर्यादीनुसार ट्रेलरच्या चालकावर भादंवी कलम 304 ( अ ) , 279 , 134/177 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक लतिफ मुजावर पुढील तपास करत आहेत.

You cannot copy content of this page