दुबईवरुन ‘मातोश्री’ निवासस्थान उडवुन देण्याची धमकी..

0
445


अष्ट दिशा,वृत्तसेवा

मुंबई: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नावे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना धमकी देण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमच्या नावे दुबईवरून तीन ते चार वेळा कॉल आलेला आहे.

या कॉलमध्ये मातोश्री निवास स्थान उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मातोश्री येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांचे वांद्र्यातील खाजगी निवासस्थान असलेले मातोश्री उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे. दुबईवरून मातोश्रीवर धमकीचे तीन चार फोन आले.

त्या फोनवरून मातोश्री उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या हस्त काने हे फोन केल्याचे समोर आले आहे. हे धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्रीवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.