देवघर येथील काळभैरवनाथ महाराजांच्या पालखीचे एकविरा गडाकडे प्रस्थान…

0
132

कार्ला दि.7:आज षष्टी च्या दिवशी आई एकविरा देवीचे माहेरघर असलेल्या देवघर वाकसई येथील देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

या पालखी सोहळ्यासाठी दुपारपासून मुंबई , रायगड , कोकण , तळकोकण भागातून आलेल्या आई एकविरा देवीच्या पालख्या याठिकाणी भाऊ काळभैरवनाथाची भेट घेण्यासाठी आल्या होत्या . रात्री 8: 30 वाजता भैरवनाथ महाराजांची आरती झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली . भाविकांनी व श्री काळभैरवनाथ आणि महादेव देवस्थान ट्रस्ट देवघरच्या पदाधिकाऱ्यांनी पालखी खांद्यावर घेतली व एकविरा गडाकडे प्रस्थान केले. यावेळी असंख्य भाविकांच्या सुरक्षे बाबत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दिवसभर हजारो भाविकांनी आज काळ भैरवनाथांचे दर्शन घेतले . काळो , आग्री समाजातील अनेक भाविक व पालख्या आज देवघरात दाखल झाल्याने देवघरचा परिसर गजबजला होता.

श्री काळभैरवनाथ व महादेव देवस्थान ट्रस्ट व श्री काळभैरवनाथ मंदिर जिर्णोद्धार समिती देवघरच्या वतीने पालखी सोहळ्यास आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत व सुलभ दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. हजारो भाविकांच्या वर्दळीत काळभैरव पालखीचे एकविरा गडाकडील प्रस्थान अगदी उत्साहात संपन्न झाले.