Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळादेवघर येथील धक्कादायक घटना, एक दिवसापूर्वी असलेल्या बेपत्ता महिलेचा विहिरीत आढळला मृत्यू…

देवघर येथील धक्कादायक घटना, एक दिवसापूर्वी असलेल्या बेपत्ता महिलेचा विहिरीत आढळला मृत्यू…

लोणावळा (प्रतिनिधी): देवघर येथील एका बेपत्ता महिलेचा मृतदेह जवळील विहिरीत आढळल्याची खळबळजनक घटना शुक्रवार दि.20 रोजी उघडकीस आली.
निशा मोहन देशमुख (वय 34 रा. देवघर, ता. मावळ, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव असून हि महिला दि.19 पासून घरातून बेपत्ता होती.कुटुंबाकडून व नातेवाईकांकडून तिचा शोध सुरु होता, अशात विहिरीजवळ तिची ओढणी आढळल्यानंतर विहिरीच्या आसपास व विहिरीत शोध घेतला असता, तिचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात आढळून आला.
लोणावळा ग्रामीण पोलीस,आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले तत्पूर्वी गावकरी व शिव दुर्गचे गणेश फाळके,महादेव भवर,सागर कुंभार,अनिल आंद्रे आदींनी महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला होता. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस नाईक गणेश होळकर करत आहेत.

You cannot copy content of this page