देवघर येथील स्व. वामनराव हैबतराव देशमुख माध्यमिक विद्यालयात योग दिन उत्सहात पार पडला…

0
34

वाकसई दि.21: अंतर राष्ट्रीय योग दिन मावळ तालुक्यातील सर्व शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.

स्व वामनराव हैबतराव देशमुख माध्यमिक विद्यालयात देवघर येथे आज सकाळी 8:30 ते 11:30 या वेळेत योग शिक्षक प्रविणकुमार हुलावळे यांनी प्रात्याक्षिक सादर केले योग प्रशिक्षणात 125 विद्यार्थी,10 पालक व 8 शिक्षकांनी सहभाग घेतला.

योग शिबीराच्या सुरवातीला योग साधनेचे महत्व विजय गायकवाड यांनी सांगितले.प्रात्याक्षिक करताना भगवंत क्षिसागर यांनी आसनामुळे होणारे फायदे सांगितले शिबिरात सहभागी शिक्षक मनीषा ठिकेकर, विजय कचरे, अनिल पटेकर,नवनाथ देशमुख शंकर शिनकर, सुरेश देशमुख, दीपक देशमुख यांनी विशेष सहभाग नोंदवला.

यावेळी योग दिनाचे औचित्य साधत मुख्याध्यापक बापू पाटील सर यांनी विद्यालयात दर शनिवारी योग प्रशिक्षण होईल असे जाहीर केले तर विध्यार्थांनी या निर्णयाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. विध्यार्थांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना योगा केल्याने आनंद मिळतो असे सांगितले.