देवले गावात आढळले आठ फुटी अजगर, सर्प मित्रांकडून जीवदान..

0
117

कार्ला : मावळ तालुक्यातील देवले गावात आठ फुट लांबीचा अजगर मिळून आल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली होती.

मावळ तालुक्यातील देवले येथील सतपाल आंबेकर यांच्या घराच्या पाठीमागे सात ते आठ फुट अजगर आढळल्याने त्यांनी सर्पमित्र निलेश आंबेकर यांना माहिती दिली.

या माहितीच्या आधारे सर्पमित्र निलेश आंबेकर सह अनिकेत कोंडभर , योगेश साठे , सौरभ आंबेकर , किसन गोणते यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ घटनास्थळ गाठले . मोठ्या चलाखीने व कुठलीही इजा न पोहोचवता देवले येथील सर्पमित्रांनी अजगराला जीवदान दिले . व हा अजगर सुखरूप जंगलात सोडण्यात आला असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली .