Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडदेशाची आर्थिक स्थिती , सुरक्षा तसेच अठरापगड जातीला न्याय देण्याचे काम मोदी...

देशाची आर्थिक स्थिती , सुरक्षा तसेच अठरापगड जातीला न्याय देण्याचे काम मोदी सरकारने केले – श्रीरंग आप्पा बारणे..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) देशाची आर्थिक स्थिती बदलण्याचे काम , देशाची सुरक्षा रक्षकांना आधुनिक यंत्रणा व शस्त्रे देण्याचे काम तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधानाच्या माध्यमातून अठरापगड जातींना न्याय देण्याचे काम मोदी सरकार यांनी केले आहे , मात्र विरोधक संविधान बदलत असल्याची ओरड करत आहेत , असे परखड मत महा युतीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या शेळके हॉल – किरवली येथील प्रचार सभेला उपस्थित जनसमुदाय समोर व्यक्त केले.

शुक्रवार दिनांक ३ मे २०२४ रोजी भाजपने आयोजित केलेल्या प्रचार सभेत यावेळी व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे , आमदार प्रशांत ठाकूर , माजी आमदार सुरेश भाऊ लाड , जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी , जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर , विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे , मा. नगराध्यक्ष शरद भाऊ लाड , जिल्हा नेते तानाजी चव्हाण , जिल्हा महासचिव दिपक बेहेरे , पाटील , जिल्हा सचिव रमेश मुंडे , मंगेश म्हसकर , अश्विनी पाटील ,स्नेहा गोगटे , जगदीश ठाकरे , नितीन कांदळगावकर , अतुल बडगुजर , त्याचप्रमाणे कर्जत खालापूर मतदार संघातील अनेक पदाधिकारी , महिला वर्ग उपस्थित होते.

यावेळी आप्पा बारणे यांनी या मतदार संघात मी केलेली कार्य मोठ्या प्रमाणात आहेत , हे सांगून सन्मान योजना माध्यमातून अती दुर्गम भागात आदिवासी पाड्यात वीज , पाणी व रस्ता देण्याचे कार्य केले , रेल्वेची कामे केली , पनवेल उरण तसेच कर्जत पनवेल रेल्वेचे काम सुरू आहे , मेट्रो रेल्वे पनवेल पर्यंत येणार आहे , पर्यटनाला चालना दिली . ही निवडणूक देश कुणाच्या ताब्यात द्यायचं , याची आहे , मी २ वेळा या मतदार संघात निवडून आलो असून मला यावेळी पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून द्या , असे आवाहन त्यांनी केले.

तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी घराघरात पाणी , वीज , गावागावात रस्ते अशी विकास कामे मोदी सरकारच्या माध्यमातून देशात सुरू आहेत , देशाची सुरक्षा करणारे भक्कम नेतृत्व म्हणजे मोदी , त्यांची आज देशाला गरज आहे , तसेच मावळ च्या विकासासाठी आप्पा बारणे यांनी संसदेत आवाज उठवून विकास साधला आहे ,त्यांना बहुमताने निवडून द्या , असे आवाहन केले.

माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी देशात , काश्मीरमध्ये देशसेवा करणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढविण्याचे काम मोदी साहेबांनी केले , या त्यांच्या सरकारमध्ये खासदार म्हणून आप्पा बारणे यांनी काम केले आहे , व देवाच्या कृपेने व तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मला त्यांचे काम करण्याची संधी मिळाली , हे माझे भाग्य मी समजतो , त्यांना येणाऱ्या १३ तारखेला निःसंकोचपणे धनुष्य बाणावर मत देवून बहुमताने निवडून द्या ,असे कार्यकर्त्यांना सूचित केले . याप्रसंगी अनेकांनी पक्षप्रवेश केला.
- Advertisment -

You cannot copy content of this page