देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील विकास कामांना परवानगी मिळावी.. आमदार शेळके यांची राजनाथ सिहं यांच्याकडे मागणी

0
33

दिल्ली : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खासदार श्रीरंग बारणे यांच्यासमवेत आमदार सुनिल शेळके यांनी दिल्ली येथे बुधवारी दि.30 रोजी भेट घेऊन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील विविध विकासकामांना परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघातील व केंद्रीय संरक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विकास कामे करण्यासाठी केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक असते.परवानगी शिवाय कोणतीही विकासकामे करता येत नसल्याने मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

त्या अनुषंगाने केंद्रीय संरक्षण विभागाच्या अखत्यारीत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील ऐतिहासिक धम्मभुमीच्या जिर्णोद्धाराच्या कामास संरक्षण विभागाकडून संमती मिळावी,देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सिद्धीविनायक नगरी येथील मंजूर असलेल्या पाणी पुरवठा योजनेस संरक्षण विभागाकडून ‘ ना हरकत प्रमाणपत्र ‘ मिळावे, तसेच श्री क्षेत्र देहू ते निगडी पालखी मार्गावर संरक्षण विभागाच्या हद्दीतील रस्ता रुंदीकरणास मंजुरी मिळावी अशी मागणी यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघातील व केंद्रीय संरक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विकास कामे करण्यासाठी केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक असते . परवानगी शिवाय कोणतीही विकासकामे करता येत नसल्याने मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने खासदार श्रीरंग बारणे यांच्या समवेत आमदार सुनील शेळके यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सदर विविध मागण्या केल्या आहेत.