देहू नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय..

0
29

देहू : देहू ग्रामपंचायतचे नगरपंचायत होताच सर्वात पहिल्यांदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली आहे.

देहू नगरपंचायत निवडणूकीत 17 जागांपैकी 14 जागांवर राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळविला तर उर्वरित 3 जागांपैकी भाजप 1, तसेच अपक्ष 2 असे उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या या दणदणीत विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.

देहू ग्रामपंचायत चे नवीनच नगरपंचायत मध्ये परिवर्तन झाल्यामुळे यंदा मतदारांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला होता.देहू नगरपंचायतीचा निकाल लागताच भंडारा उधळत, फटाके फोडत, ढोल ताशांच्या तालावर काही कार्यकर्त्यांनी ठेका धरल्याचे दृश्य निदर्शनास येत होते.

देहू नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी विजयी झाल्याने मावळचे आमदार सुनील शेळके यांनी मतदारांचे आभार मानताना या निवडणुकीत जनतेनं राष्ट्रवादीवर विश्वास ठेवला, संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन असल्यानं तिर्थक्षेत्राचा विकास करू, अशी ग्वाही आमदार शेळके यांनी यावेळी दिली आहे.