Friday, June 9, 2023
Homeपुणेमावळधनिकांची अतिक्रमणे पाडून दाखवावी तरच गरिबांच्या घरांना हात लावा-किशोर आवारे…

धनिकांची अतिक्रमणे पाडून दाखवावी तरच गरिबांच्या घरांना हात लावा-किशोर आवारे…

मावळ (प्रतिनिधी): तळेगाव येथील डीपी रोडच्या रुंदीकरणांमध्ये कायम रहिवासी असणाऱ्या नागरिकांची राहती घरी पाडून त्यांना बेघर करू नका त्यांना राहण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने पक्क्या घरांची व्यवस्था करावी तसे न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी दिला आहे.
म्हाडाच्या प्रस्तावित रोडसाठी अडसर असणाऱ्या तीन घरांना तातडीने पाडण्याची नोटीस नगरपरिषद प्रशासनाने दिल्याने तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु किशोर आवरे यांनी आक्रमक भूमिका घेत येथील रहिवाशांना दिलासा मिळवून दिला आहे.
आधी लोकांच्या कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करा मगच यांची घरे पाडा असे किशोर आवारे यांनी नगर प्रशासनाला खडसावून सांगितले आहे. तळेगाव शहरात अनेक अनाधिकृत बांधकामे आहेत तसेच ग्रीन झोन मध्ये देखील अनेक अनधिकृत बांधकामे होत आहेत धनाढ्य बिल्डर्स व काही राजकीय आश्रय असणाऱ्या धनिकांचे अनधिकृत बांधकाम मुख्याधिकाऱ्यांनी पाडून दाखवावे मगच गरिबांच्या घरांना हात लावावा. एकही गरीबाचे घर पुनर्वसन झाल्याशिवाय तोडू देणार नाही असे आवाहन किशोर आवारे यांनी केले आहे .
तळेगाव दाभाडे नगर परिषदेने सध्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे, ती करत असताना येथील जोशी वाडी मधील रहिवाशांना रस्ता रुंदीकरणात अडथळा येणारी घरे पाडण्यात येतील असे वेळोवेळी नोटिसीद्वारे नगरपरिषदेने कळवले होते. त्यामुळे किशोर आवारे यांनी सर्व नागरिकांना घेऊन नगरपरिषदेमध्ये जाऊन नगरपरिषद प्रशासनास वेठीस धरले.

You cannot copy content of this page