Thursday, September 28, 2023
Homeपुणेलोणावळाधम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आर पी आय ( A )च्या वतीने विश्वरत्न डॉ...

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आर पी आय ( A )च्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण…

लोणावळा (प्रतिनिधी) १४: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लोणावळ्यात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(ए)पुणे लोणावळा शहराच्यावतीने जिल्हाध्यक्ष विकास साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.


१४ऑक्टोबर १९५६ ला सम्राट अशोक विजयादशमीच्या निमित्ताने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून धम्मचक्र गतीमान करून शोषित पिडीत तथा दुर्लक्षित घटकांना नवी संजीवनी दिली,त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी लोणावळा शहराच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


यावेळी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अंकुश चव्हाण, तालुकाध्यक्ष दत्ता यादव,तालुका उपाध्यक्ष विनोद साळवे,युवक आघाडी तालुकाध्यक्ष चंद्रकांत ओहाळ,युवक तालुका संघटक जे के गरज,युवक आघाडी युवक तालुका कोष्याध्यक्ष किशोर वंजारी,युवक तालुका संघटक सचिन साळवे,शहर उपाध्यक्ष कैलास मोरे,युवक शहर अध्यक्ष निलेश देसाई, हनुमान टेकडी विभाग अध्यक्ष भरत कदम,सिद्धार्थ नगर कार्याध्यक्ष मिलिंद जाधव, सिध्दार्थ नगर भैरवनाथ विभाग अध्यक्ष महेंद्र व्याहीलकर,शिल्पा जाधव,निता कैलास मोरे, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक राहूल मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

- Advertisment -