Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळानंदिका कामत हीला "55 व्या नीट इंडिया 2022 व होनेस्टी अवॉर्ड" प्रदान..

नंदिका कामत हीला “55 व्या नीट इंडिया 2022 व होनेस्टी अवॉर्ड” प्रदान..

लोणावळा (श्रावणी कामत) : “55 व्या नीट इंडिया 2022 व होनेस्टी अवॉर्ड”यावर्षी पुणे जिल्ह्यातील लोणावळा ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल मधील इयत्ता 10 वी.ची विद्यार्थीनी नंदिका धनंजय कामत हिला देण्यात आला.
इंदोर येथे नुकताच 55th नीट इंडिया 2022 व होनेस्टी अवॉर्ड सेरेमनी पार पडली. राज्यभरातून 9 शाळेच्या विद्यार्थांना होनेस्टी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी फादर वर्गिस, सौं एनी पवार, फादर जोकब, फादर आईसेस, IPS अनुराधा शंकर, श्रीमती नितु जोशी, डॉ. भरत छापरवलं, नितीश बरोळे, अंकिता बॅनर्जी, आशिष त्रिवेदी, लिमा धर, मार्गरेट गोवरीनाथ, फादर जेम्स, बिन्सी मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याधपिका सिस्टर शीला फुटेर्डी व शिक्षिका व पालक यांनी प्रेरणा दिल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे नंदिका कामत हिने यावेळी सांगितले.

You cannot copy content of this page