![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते…
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) आपल्या प्रभागाचा विकास कामांच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलण्याचे व नागरिकांची स्वप्न साकार करण्यासाठी अग्रेसर असणारे कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक ऍड.संकेत भासे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामांचे लोकार्पण सोहळा आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते पार पडले . कर्जत शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत , म्हणूनच कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यामातून ३६ कोटी रुपयांचा विकास निधी नगरसेवक संकेत भासे यांच्या प्रभागात देऊन विविध विकास कामे करण्यात आले.
कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली प्रभागातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा नगरसेवक संकेत भासे यांच्या वाढदिवस निम्मित पार पडला , यावेळी प्रभागातील १ कोटी ७५ लाख रुपयांची विकास कामे करण्यात आली . यात छत्रपती शिवाजी महाराज गार्डन , साईनगर गार्डन, संजय नगर येथील रस्ता , बस थांबा , अंतर्गत रस्ते अश्या विविध कामांचा समावेश आहे.
यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे , शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर , संघटक संतोष भोईर , संपर्क प्रमुख पंकज पाटील , नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, बांधकाम सभापती राहुल डालिंबकर, नगरसेविका सुवर्णा नीलधे , मधुरा चंदन , प्राची डेरवणकर , वैशाली मोरे , विशाखा जिनघरे , स्वामीनी मांजरे , भारती पालकर , नगरसेवक बळवंत घुमरे , मुख्याधिकारी वैभव गारवे , रमेश मते, शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , शहर अधिकारी सचिन भोईर, शहर संपर्क प्रमुख अभिजित मुधोळकर , ऋषभ दादा लाड , उपशहर प्रमुख दिनेश कडू , विभाग प्रमुख विशाल बैलमारे , रमाकांत जाधव , दिलीप बोराडे , अजय सुवर्णे , डॉ वैद्य , डॉ म्हात्रे , भाऊ खानविलकर आदी मान्यवर उपस्थित होते.