नवीन वर्षाच्या सुरुवातीला भुशी धरणात बुडून 19 वर्षीय युवकाचा मृत्यू..

0
467

लोणावळा दि.3 : लोणावळा भुशी धरणाच्या पाण्यात बुडून 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दि.2 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

सोहेल अहमदअली शेख ( वय 19, रा. गोवंडी मुंबई ) अशी मयत झालेल्या युवकाची माहिती आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सोहेल हा रविवारी सायंकाळी भुशी धरणात उतरला परंतु त्याला पोहता येत नसल्या कारणाने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला अशी माहिती सोहेलचे वडील अहमदअली अब्दुलसईद शेख यांनी पोलिसांना दिली आहे.

घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विजय मुंडे (लोणावळा शहर पोलीस ठाणे ) हे करत आहेत.