Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडनांदेड मधील अक्षय भालेराव निर्घृण हत्येप्रकरणी कर्जत मधील संविधानवादी पक्ष, संस्था, संघटना...

नांदेड मधील अक्षय भालेराव निर्घृण हत्येप्रकरणी कर्जत मधील संविधानवादी पक्ष, संस्था, संघटना आक्रमक !

मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून व्यक्त केला संताप..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) आज कर्जत तालुक्यातील सर्व पक्ष, संस्था, संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने मा.तहसिलदार साहेब कर्जत यांचेमार्फत मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना नांदेड जिल्हयातील बोंडार हवेली हया गावामध्ये ” विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ” यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात ठेवून जातीयवादी गावगुंडांनी अक्षय भालेराव याची निघृणपणे हत्या करण्यात आली तसेच अक्षयच्या आई व भावाला ही गंभीर मारहाण करण्यात आली , याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र भर उमटले असताना आज कर्जत तालुक्यात देखील सर्व पक्ष , संस्था, संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे वतीने संताप व्यक्त करत मा.तहसिलदार व कर्जत पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

यावेळी मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आलेल्या निवेदनात नांदेड जिल्हयातील पोलीसांनी दाखल केलेल्या आरोपी संख्या केवळ ९ दर्शविली आहे. हया हत्येच्या कटात अनेकांचा सहभाग असून आरोपींना राजकीय अभय दिला जात असल्याचे बोलले जात आहे. आरोपींना अनेकांचे छुपे पाठबळ आहे. सबब हत्याकांड होणेपुर्वी आणि हत्याकांड नंतर हे ९ आरोपी ज्या कोणाच्या संपर्कात होते , त्यांचा कॉल डेटा सिडीआर काढून त्या सर्वांची चौकशी करून पाठबळ देणारे आणि हत्याकांड घडवून आणणारे मास्टर माईंड व सहकार्य करणारे हयांना सहआरोपी करण्यात यावे.
नांदेड जिल्हयात जातीयवाद वाढत आहे. त्यात हया हत्याकांड आणि इतरांना केलेल्या मारहाणीमुळे प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. तेथील पोलीस व प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असून पीडीताच्या कुटूंबास पोलीस संरक्षण देण्यात यावे , तसेव हया गुन्हयातील सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी. सदर गुन्हयाचा योग्य तपास होऊन आरोपींना फाशीची शिक्षा होणेसाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे , जेणेकरून अशा घटना वारंवार घडू नयेत. सदर गुन्हातील फिर्यादी व साक्षीदार तसेच त्यांच्या कुटूंबांना पोलिस संरक्षण देणेत यावे. मयत अक्षय भालेराव याचे कुटूंबाचे पुनवर्सन होणेसाठी त्यांना १ कोटी आर्थिक मदत देणेत यावी. तसेच कुटूंबातील व्यक्तींना सरकारी नोकरी देणेत यावी , अश्या संतप्त मागणीचे निवेदन देण्यात आले.

तसेच महाराष्टात अलीकडे जातीयवादातुन असे हत्याकांड होणेचे प्रकार खुप वाढलेले आहे. सोशिअल मिडीयाच्या माध्यमातुन दंगली घडविण्याचे कट कारस्थान काही जातीयवादी मंडळी करीत आहेत , अशा प्रकारांवर सरकारकडून वेळीचं उपाययोजना केली नाही तर पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक परिस्थीती बिघडणेची शक्यता आहे , तरी यावर सरकारने विशेष लक्ष घालुन योग्य अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे , असा शांतता संदेश देणारे निवेदन आज मा.तहसिलदार – कर्जत , मा.पोलीस निरीक्षक कर्जत यांना दणेत आले. यावेळेस कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -