नागराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नांतून केशवनगर मधील प्रलंबित रस्त्याचा विषय मार्गी..

0
72

वडगाव : शहरातील प्रभाग क्रमांक एक केशवनगर मधील स्वप्नपूर्ती इमारत ते पवार वस्ती व इंद्रायणी अपार्टमेंट ते स्वप्नपूर्ती इमारत या भागातील रस्याचा प्रलंबित विषय वडगाव नगरपंचायत माध्यमातून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने मार्गी लागला आहे.

मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या पुढाकाराने या भागातील रस्ता डांबरीकरणासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून सुमारे 22 लक्ष 56 हजार रुपये इतक्या निधीतून या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले.

येत्या काही महिन्यात आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या माध्यमातून या भागातील विकासकामांसाठी अजून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी दिले.