नाना पटोले यांच्या वक्तव्याचा लोणावळा भाजपा कडून निषेध…

0
162

लोणावळा : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पुन्हा पंतप्रधान विषयी बोलताना जिभ घसरली . काही दिवसांपूर्वीच त्यांच्या विधानाचा निषेध करत भाजपा लोणावळा शहर तर्फे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी केली होती .

आता पुन्हा त्यांनी ” ज्याची बायको पळून जाते त्याला मोदी म्हणतात ” असे वाचाळपणाचे प्रदर्शन करत पंतप्रधानांविषयी चुकीचे वक्तव्य केले असल्याची टिका माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केली आहे .

तसेच नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्याचे दहन करत भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा लोणावळाच्या वतीने संताप व्यक्त करत नाना पटोलेंचा निषेध नोंदवीण्यात आला आहे.

या प्रसंगी लोणावळा नगरीच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा , भाजपायुमो शहराध्यक्ष शुभम मानकामे , महिला आघाडी अध्यक्षा योगिता कोकरे , युवा वारियर्स पश्चिम महाराष्ट्र सह संयोजक प्रथमेश पाळेकर , श्रवण चिकणे , बाबू संपत , सुनील बोके , आयुष कांकरिया , विजय सकट , शुभम दाभाडे , संकेत निकुडे , ओमकार पाटील , आकाश राठोड , कावेरी काळे , सुजाता मेहता , परिजा भिलारे , राधिका संपत व भाजपा युमोचे तसेच शहर भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.