नारायणी धाम रोड जवळ महामार्गाच्या वाहनांचा वेग कमी करण्यासाठी उपाययोजना करा , मनसेची मागणी.

0
83

लोणावळा : मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर नारायणी धाम पोलीस चौकी जवळ वाहनांचा वेग कमी करण्याहेतु उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आय आर बी कंपनीला निवेदन देण्यात आले आहे.

मुंबई पुणे महमार्गावर नारायणी धाम पोलीस चौकी येथील रस्ता सुसाट असल्याने येथे वाहनांचा वेगही जास्त असतो, शिवाय हा रस्ता कैवल्य विद्या निकेतन, गुरुकुल हायस्कूल या शाळांना जोडला असून याठिकाणी विध्यार्थी वाहनांची वर्दळ सुरु असते आणि हा रस्ता ओलांडताना यापूर्वी अनेक अपघात झालेले आहेत व याठिकाणी विध्यार्थ्यांना धोका निर्माण झाला असून या ठिकाणी महामार्गावरील वाहनांचा वेग कमी करण्या हेतू आय आर बी कंपनी ने आवश्यक उपाय योजना कराव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आय आर बी कंपनीला निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी मनसे चे लोणावळा शहर अध्यक्ष संदीप पोटफोडे, अध्यक्ष सचिन इंगुळकर, माजी शहराध्यक्ष सुशील पायगुडे उपस्थित होते.

नारायणी धाम पोलीस चौकी जवळ महामार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याठिकाणी वलवण, पांगोळी, तुंगार्ली गावांबरोबर कैवल्य विद्या निकेतन व गुरुकुल अशा दोन शाळांचा रस्ता जोडला गेला आहे. याठिकाणी हा रस्ता ओलांडताना खूप वर्दळ असते अनेक भीषण अपघात याठिकाणी घडलेले आहेत. त्यामुळे येथील महामार्गावरील वाहनांचा वेग कमी करण्यासाठी संबंधित प्रशासनाने योग्य उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे.