निखिल कवीश्वर यांच्या तर्फे मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त ड्राय फ्रुटस वाटप..

0
283

लोणावळा : काँग्रेस (आय ) चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, लोणावळ्यातील नगरसेवक नीखीलभाऊ कवीश्वर यांच्यातर्फे सामाजिक एकोपा जपत मुस्लिम बांधवांना ड्राय फ्रुटस चे वाटप करून ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर निखिल कवीश्वर यांच्या तर्फे लोणावळा शहरातील ई वॉर्ड,अण्णाभाऊ साठे वसाहत परिसर,रोहिदास वाडा,नगरपालिका चाळ,मातंग वाडा,इराणी चाळ, डी वॉर्ड परिसर, सत्तार चाळ या ठिकाणी ड्राय फ्रुट्स (सुखा मेवा) चे वाटप करण्यात आले.यांनी केलेल्या या सामाजिक कार्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद उमळून आला होता.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेस चे लोणावळा शहर निरीक्षक नासीर शेख,मावळ तालुका युवक उपाध्यक्ष फिरोज बागवान, उद्योजक केतन जाधव,नितीन नगरकर,मजहर खान,अल्लाबक्ष शेख,मकबूल शेख, शाहिद शेख,संजय डेंगळे, मुराद शेख इत्यादी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.