Saturday, October 1, 2022
Homeपुणेपिंपरी चिंचवडनिगडी सिद्धार्थ नगर झोपडपट्टीतील घरात छापा 5 की.126 ग्रॅम गांजा हस्तगत...

निगडी सिद्धार्थ नगर झोपडपट्टीतील घरात छापा 5 की.126 ग्रॅम गांजा हस्तगत…

निगडी : ओटास्किम मधील सिद्धार्थनगर झोपडपट्टीमधील दोन घरात छापा मारून अंमली पदार्थ विरोधी पथकाने 5 किलो 126 ग्रॅम गांजा जप्त केला . ही कारवाई शुक्रवार दि.1रोजी रात्री 7:30 च्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप शेलार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार सावळा शिवाजी खाडे ( रा . सिद्धार्थनगर , निगडी ) आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिद्धार्थनगर झोपडपट्टी येथे एका महिलेकडे गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.त्यानुसार पोलिसांनी महिलेच्या घरावर छापा मारून कारवाई केली.त्यात 30 हजार 760 रुपयांचा 1 किलो 210 ग्रॅम गांजा आढळला.त्या महिलेने गांजा दुसऱ्या महिलेकडून आणला असल्याचे सांगितले . त्यामुळे पोलिसांनी दुस या महिलेच्या घरी छापा मारला असता तिच्या घरात पोलिसांना 1 लाख 9 हजार 800 रुपयांचा 3 किलो 916 ग्रॅम गांजा आढळला.दुसऱ्या महिलेने तिच्याकडील गांजा सावळा खाडे यांच्याकडून आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे . दोन्ही ठिकाणी मिळून पोलिसांनी 5 किलो 126 ग्रॅम वजनाचा 1 लाख 40 हजार 560 रुपयांचा गांजा जप्त केला आहे . निगडी पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page