नितीन मराठे यांच्या सौजन्याने वडगावमध्ये वारकऱ्यांचा सन्मान…

0
23

वडगाव मावळ : अखिल भारतीय वारकरी मंडळ व श्री . पोटोबा देवस्थानच्या वतीने वडगावमध्ये पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंडीतील विनेकरी , अध्यक्ष व महिला भगिणी यांचा सन्मान करण्यात आला . तसेच मावळ तालुक्यातील 36 दिंड्यांना स्वयंपाक करण्यासाठी शेगडी देण्यात आली .

मागील 11 वर्षांपासून वडगावमध्ये वारकऱ्यांचा सन्मान , होत असताना यावर्षी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या सौजन्याने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असून या कार्यक्रमासाठी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवस्थानच्या कार्याला सर्वोतपरी मदत करू असे आश्वासन दिले.

राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी या उपक्रमाबद्दल वारकरी मंडळ व देवस्थानचे कोतुक केले . श्री . पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त , सोपानराव म्हाळसकर यांनी देवस्थानच्या कार्याचा आढावा दिला . यावेळी उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे , जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे , तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे , ह.भ.प. सुखदेव महाराज ठाकर , ह.भ.प. मंगल जगताप , ह.भ.प तुषार दळवी , ह.भ.प दत्तात्रय शिंदे , ह.भ.प. गणेश जांभळे , भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर , नगराध्यक्ष मयूर ढोरे , मा . सभापती गुलाबराव म्हाळसकर , शांताराम कदम , पंढरीनाथ ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.