निलेश ठाकर यांची येळसे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड…

0
23

पवना नगर : येळसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निलेश रामदास ठाकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मावळते उपसरपंच अक्षय कालेकर यांनी कार्यकाल संपल्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याने उपसरपंच पदाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी सरपंच सीमाताई ठाकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक घेण्यात आली.

यावेळी निर्धारित वेळेत निलेश ठाकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी एम.के.चांदगुडे यांनी जाहीर केले आहे.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चांदगुडे यांनी काम पाहिले . निवडीनंतर पुष्पवृष्टी , गुलालाची उधळण करत भव्य मिरवणूक काढत जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी पंचकृषीतील अनेक राजकीय मंडळींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा दिल्या. तसेच पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर , ॲड . भरत ठाकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकर , भाजपा संघटनमंत्री गणेश ठाकर , मा . उपसरपंच विठ्ठल ठाकर , आबु ठाकर यांसमवेत ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.