![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी):भारतीय सेनेतून तीस वर्ष सेवानिवृत्त सुभेदार कैलास येवले यांचा वाकसई मावळ येथील स्वयंभू गणेश कमिटी, जागृती मित्र मंडळ व जनसेवा तरुण मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
निवृत्त सुभेदार कैलास येवले यांनी भारतीय सेनेत तीस वर्ष सेवा केल्याचा सार्थ अभिमान असून त्यांचा गौरव होणे हे तरुण पिढीस प्रेरणादायी ठरेल अशी भावना व्यक्त करत वाकसई येथील स्वयंभू गणेश कमिटी, जागृती मित्र मंडळ व जनसेवा तरुण मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योजक प्रतीक देसाई,विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रदीप येवले,आरती प्रकाश कारके, सोपान सुतार, यशवंत येवले, मारुती येवले, चंद्रकांत मडके, दत्तात्रय मडके, सखाराम येवले, अरुण देसाई,विनोद येवले, सुनील बोत्रे, किसन जयवंत येवले, किसन येवले, सुनील कारके, सुधाकर येवले, बाळासाहेब सत्तू येवले, नवनाथ येवले, गणपत येवले, शांताराम देसाई, अनिल देसाई, जयदीप मोरे, प्रमोद येवले, शिवाजी येवले आदी मान्यवर उपस्थित होते.