पंढरपुरात अतिवृष्टी मुळे मृत्यू पावलेल्या अभंगराव कुटूंबाला, सरकारने तात्काळ मदत करावी-आमदार रमेश पाटील….

0
82


खोपोली- दत्तात्रय शेडगे

सद्य सगळीकडे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पाऊस पडत आहे,त्याचंबरोबर भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले असताना पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचा कुंभरघाट बांधा कोसळून कोळी समाजातील अभंगराव या एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्दर्वी मृत्यू झाला, यामुळे या कुटूंबावर मोठे संकट कोसळले असून या कुटूंबाची आमदार रमेश पाटील यांनी भेट घेत एक लाखाची आर्थिक मदत केली.

तर या कुटूंबाचे सरकारने पुनर्वसन करून त्यांना नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा आमदार रमेश पाटील यांनी सरकार कडे केली आहे,सोलापूर जिल्ह्यात सद्य अतिवृष्टी होऊन मोठया प्रमाणात पाऊस पडत असून यामुळे पंढरपूरातील चंद्रभागा नदीला पूरस्थिती निर्मान होऊन चंद्रभागा नदीचा कुंभारघाट बांधा कोसळून अभंगराव कुटूंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, याची दखल आमदार रमेश पाटील यांनी घेतली असून त्याचा एक लाखाची आर्थिक मदत केली.
तर सरकारने या कुटूंबाचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर मिळून द्यावे तर निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या व अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी कोळी महासंघाचे अध्यक्ष तथा आमदार रमेश पाटील यांनी सरकारकडे केली आहे.
यावेळी आमदार रमेश पाटील, कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, उपनेते देवांनंद भोईर, उपाध्यक्ष अरुण कोळी,जेष्ठ नेते साईनाथ अभंगराव, उपनागराध्यक्ष अनिल अभंगराव, कर्मचारी अध्यक्ष रामभाऊ कोळी, सल्लागार डी एम कोळी, सभापती विक्रम शिरसट, विक्रांत माने, पांडुरंग सावंतराव ,गणेश अंकुशराव आदींसह अनेक कोळी समाज बांधव उपस्थित होते.