Thursday, June 1, 2023
Homeपुणेमावळपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ,वडगांव येथे भाजपचे माफी...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ,वडगांव येथे भाजपचे माफी मागो आंदोलन…

मावळ(प्रतिनिधी):देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विषयी बेताल जातीवाचक आणि अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांचा भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करून त्यांनी देशाची माफी मागावी यासाठी माफी मागो आंदोलन वडगांव मावळ येथे करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश तात्या भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, मा.सभापती गुलाब म्हाळसकर,तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मा.नगरसेवक अरुण भेगडे,तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कूडे, लोणावळा शहर अध्यक्ष रामविलास खंडेलवाल,देहूरोड शहर अध्यक्ष बाळासाहेब शेलार,पुणे जिल्हा युवा मोर्चा कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले,मावळ तालुका युवा मोर्चा कार्याध्यक्ष गणेश ठाकर,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page