पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने घेतला गळफास…. मावळातील सुदुंबरे येथील घटना…

0
454

मावळ : पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 16 मार्च रोजी दुपारी दोन च्या सुमारास मावळातील सुदुंबरे येथे घडली.

पती हा व्यसन करण्यासाठी पत्नीकडे पैशांची वारंवार मागणी करत असे . पैसे न दिल्यास तसेच माहेरहून न आणल्यास तिला मारहाण करत असे . पतीच्या या त्रासाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली .

विनायक निवृत्ती गाडे ( वय 38 , रा . सुदुंबरे , ता . मावळ ) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे . याप्रकरणी अक्षय मधू निंबळे ( वय 25 , रा . लोणावळा ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी हा फिर्यादी यांच्या बहिणीचा पती आहे . तो काहीही कामधंदा करत नव्हता . स्वतःची हौसमौज , चैनी व व्यसनाकरिता तो त्याची पत्नी फिर्यादी यांची बहीण हिच्याकडे पैसे मागत असे . तिने पैसे न दिल्यास माहेरहून , आईवडील , भाऊ किंवा इतर नातेवाईकांकडून पैसे आणण्यास सांगत असे . पैसे न मिळाल्यास तो फिर्यादी यांच्या बहिणीला हाताने मारहाण करून तिला शिवीगाळ करत छळ करत असे . त्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या 31 वर्षीय बहिणीने 16 मार्च रोजी दुपारी पावणे दोन वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.