पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न !

0
755

वडगाव मावळ : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून कामशेत येथील एकाचे अपहरण करून तलवारीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवार दि . 29 ते गुरुवार दि.30 रोजी मावळ व मुळशी हद्दीत घडला.

याप्रकरणी जखमी पीडित प्रशांत शांताराम भेगडे ( वय 29 , रा . इंद्रायणी कॉलनी , कुसगाव रोड कामशेत ता.मावळ जि . पुणे ) याने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार राजू सोपान आंद्रे ( रा . नाणे , ता . मावळ , जि . पुणे ) व अनोळखी 4 जणांविरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , आरोपी राजू आंद्रे यांना त्यांच्या पत्नीसोबत फिर्यादी प्रशांत भेगडे यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता . या संशयातून आरोपी राजू आंद्रे व अन्य 4 साथीदार यांनी संगनमताने फिर्यादी भेगडे यांना जेजुरीचे भाडे आहे . भाडे ठरवायला या . असे सांगुन फिर्यादीस कान्हे ते टाकवे बुद्रुक रोडवरील , जांभुळ फाटा येथे बोलवले . त्यानंतर फिर्यादी यांचा खून करण्याच्या उद्देशाने एका कार मधून अपहरण केले नंतर कुसुगाव ( प . मावळ ) येथील एका डोंगरावर नेऊन फिर्यादी यांची कपडे काढून त्यांच्या पायावर , पाठीवर , छातीवर दगडाने मारहाण केली . आरोपी राजू आंद्रे याने तलवारीने डोक्यात वार करून गंभीर दुखापत केली . तसेच फिर्यादी मयत झाल्याचे समजून त्यांना ताम्हिणी घाट ( ता . मुळशी ) येथील खोल दरीत टाकून देण्यासाठी कारमधून घेऊन जाऊन पिंपरी ( ता . मुळशी ) येथील एका खोल दरीत टाकून देण्याचा प्रयत्न करून फिर्यादी भेगडे याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सस्ते हे करत आहेत.