पनवेल येथे सदगुरु श्रीवेणाभारती महाराज यांच्या दिव्य वाणीतून श्री रामायण व दर्शन सोहळा !

0
31
भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे)सद्गुरु श्रीवेणाभारती महाराज यांच्या दिव्य वाणीतून श्रीरामायण सत्संग कार्यक्रम श्री कपिकुल सिद्धपिठम पनवेल केंद्राच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त व नुतन वर्ष प्रारंभीच बुधवार दि. ५ जानेवारी ते रविवार दि.९ जानेवारी २०२२ रोजी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. दैनंदिन जीवनात रामायणातील आदर्श कसा घ्यावा ज्यामुळे संपूर्ण जीवनच उजळून जाईल , असे दिव्य ज्ञान साक्षात परमहंस संन्यासीनी श्री गुरूंच्या अमृतवाणीतून सतत पाच दिवस श्रवणाची सुवर्णसंधी आपल्या पनवेलमध्ये होणार असल्याने भक्त गणांनी सत्संग श्रवणाचा व दर्शन तसेच भिक्षा फेरीत अन्न दान करण्याची संधी उपलब्ध आहे.
याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री कपिकुल सिद्ध पिठम यांनी केले आहे. श्रीकपिकुल सिद्धपिठम नाशीक च्या पनवेल शाखेच्या तृतीय वर्धापन निमित्त १००८ ” श्रीमंत तपोमूर्ती परमहंश सद्गुरु संन्यासिनी श्रीवेणाभारती महाराज ” यांच्या ईश्वरीय प्रवचन व दिव्य दर्शनाचा सोहळा पनवेल शहरात दिनांक ५ ते ९ जानेवारी २०२२ दरम्यान आयोजित केलेला आहे . यावेळी श्री गुरूंचे आजच्या जीवनासाठी श्रीरामायण या सुंदर पापविमोचक विषयावर अतिशय ज्ञानपूर्ण प्रवचनमाला व प्रसाद रोज असणार आहे ,तरी भक्तजनांना आग्रहाचे आमंत्रण आहे की सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा , त्याचबरोबर कोणास श्री गुरुमंत्र दीक्षा घ्यावयाची असेल तसेच कौटुंबिक समस्या प्रश्न व श्री गुरूंशी संवादीत करायचे असतील तरी आधी नाव नोंदणी करावी तसेच प्रवचन स्थळी श्रीगुरुकृपा आशीर्वादित भारतभर गेली दहा वर्षाहून अधिक प्रसिद्ध व मागणी असलेले अध्यात्मिक साहित्य , विविध दोष निवारक शुभफलदायी वस्तू तसेच श्रीकपिकुल उत्तराधिकारी तथा योग- निसर्गोपचार तज्ञ श्रीकृष्णमय यांच्या प्रदीर्घ स्वाध्यायातुन निर्मित नैसर्गिक व आयुर्वेदिक वस्तूंचा स्टॉल सुद्धा येथे असणार आहे.
तरी सर्वांनी या सर्वांचा आनंद घ्यावा.साक्षात महादेव शंकर , श्री दत्तप्रभू , नवनाथ , संत ज्ञानेश्वर महाराज , समर्थ रामदास स्वामी महाराज , हे भिक्षा परंपरांचे आदी गुरू ही समर्थ परंपरा आजही कलियुगात अखंड जागती ठेवली आहे , ती गुरुदेव वेणाभारती महाराज यांनी अशा तपोनिष्ठ परमेष्ठी सन्यासी संतांचे व तयांच्या खांद्यावरील भगव्या व्रतधारणी झोळीचे दर्शन होणे हे मानवी जीवांसाठी , सृष्टीसाठी आणि अखिल ब्रह्मांडासाठी फार महत्त्वाचे असते.अखंड ब्रह्मांडाला , कोटी देवी-देवतांना , या झोळीचा व दीक्षा सोहळ्याचा अपार आनंद असतो . आपले खूप भाग्य आहे की अशा ईश्वरास प्राप्त केलेल्या श्रीसद्गुरूंचे आगमन आपल्या विभागात होणार आहे.आपल्या तपाने – ज्ञानाने – सेवेने ईश्वरास प्रसन्न करणाऱ्या , राम कार्याची , जनकल्याणाची अखंड जबाबदारी घेऊन समर्थपणे राम कार्य करणाऱ्या आदरणीय श्री शंकराचार्य द्वारे सन्मानित १००८ श्री महंत श्रीवेणाभारती महाराज आपल्या घराजवळ भिक्षेस येत आहेत ,या संत चरण दर्शनाचा भिक्षा अर्पण करण्याचा सहकुटुंब सहपरिवार जरूर लाभ घ्यावा.

पहिला दिवस ५ जानेवारी जुने पनवेल येथे , दुसरा दिवस ६ जानेवारी एचओसी कॉलनी – पनवेल स्टँड मागे , तिसरा दिवस ७ जानेवारी मोहपाडा गजानन महाराज मंदिर , गणेश नगर , येथे चौथा दिवस ८ जानेवारी ओमकार सोसायटी , सेक्टर ७ खांदा कॉलनी , तर पाचवा दिवस ९ जानेवारी सिडको पोस्ट ऑफिस जवळ असे भिक्षाफेरी होणार आहे .तरी ५ ते ९ जानेवारी २०२२ रोजी वेळ सायंकाळी ५ ते रात्री ८ , स्थळ चंद्रसेनिय कायस्थ प्रभु ट्रस्ट, श्री लक्ष्मीनारायण मंदिर शिवाजी रोड आदर्श लॉजसमोर पनवेल येथे हा कार्यक्रम होणार आहे.